spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा

कामठी :- कामठी तालुक्यात राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत ‘स्पर्श’जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून 6 फेब्रुवारीला राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कामठी च्या सौजन्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कामठी येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे यांनी शाश्वत विकास ध्येय 2030 व राष्ट्रीय धोरणात्मक आराखड्यानुसार सन 2027 पर्यंत कृष्ठरोगांचा शून्य प्रसार हे ध्येय साध्य करण्यासाठी मोठी अडचण म्हणजे खाजगी क्षेत्रातील कृष्ठरोगाची माहिती शासनास मिळत नव्हती परंतु आता कृष्ठरोग अधिसूचित आजार घोषित करण्यात आल्यामुळे सर्व खाजगी संस्थांनाही कृष्ठरुग्णांच्या नोंदी करून त्याबाबतचा अहवाल शासनास देने बंधनकारक केले आहे त्यामुळे लवकर निदान व औषधोपचार मिळाल्याने आपल्याला कृष्ठरोगाचा प्रसार थांबविणे शक्य होईल त्यामुळे सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कृष्ठरुग्णांना शासकीय रुग्णालय ,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संदर्भित करण्याबाबत आव्हान करण्यात आले. दरम्यान निम वैद्यकीय पर्यवेक्षक मनोहर येळे यांनी सध्या तालुक्यातील रुग्ण भार व कृष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रामध्ये मिळणाऱ्या सेवा बाबत सविस्तर माहिती दिली.सदर खाजगी वैद्यकीय व्यवसायिकाची कार्यशाळा यशस्वी व प्रभावीपणे पार पाडण्या करिता आरोग्य विभागातील बलराज गेडाम, धिरेंद्रकुमार सोमकुवर,सुरेंद्र गिरी,नितीन सावते,सचिन राखडे,शिलेकर, गजबे,माकडे देशटवार यांचे सहकार्य लाभले.

Popular Articles