spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सभासद घटले, नफा आटला: तरीही शिक्षक पतसंस्थेत भरतीचा घाट : उपनिबंधकाकडे तक्रार दाखल 

– शिक्षक पतसंस्थेची भरती रद्द न झाल्यास आंदोलन: किशोर बावनकर 

यासीन शेख, गोंदिया अर्जुनी-मोर :- गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., गोंदिया (र. नं. ०१) यांनी कनिष्ठ लिपिक व चपराशी पदांसाठी जाहीर केलेली कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघ गोंदिया यांनी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), गोंदिया यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.

दैनिक लोकमत (दि. ९ फेब्रुवारी २०२६) मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, सदर भरतीसाठी सर्वसाधारण सभेत कोणताही ठराव अथवा सभासदांची मान्यता घेण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.

यामध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही वर्षांपासून सेवानिवृत्तीमुळे व शासनाकडून शिक्षक भरती होत नसल्याने शिक्षक सभासदांची संख्या सातत्याने कमी होत असून त्याचा थेट परिणाम संस्थेच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. L संचालक मंडळाच्या अवाजवी खर्चामुळे नफ्यात झालेली घट व ठेवीवरील व्याजदरात कपात या पार्श्वभूमीवर नवीन कर्मचारी भरती करणे संस्थेच्या हिताचे नसल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.

सद्याच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात संस्थेची आर्थिक स्थिती ढासळल्याने ठेवीवरील व्याजदर कमी करण्यात आल्याचा उल्लेखही तक्रार अर्जात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नवीन कर्मचारी भरतीमुळे संस्थेवर अनावश्यक आर्थिक बोजा पडून भविष्यात सभासदांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

त्यामुळे ही भरती तात्काळ स्थगित करून रद्द करावी.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उपनिबंधक कार्यालय/संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन, निदर्शने व सहकार मंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

या तक्रार अर्जावर जिल्हा अध्यक्ष किशोर बावनकर, कार्याध्यक्ष हेमंत पटले, शिक्षक नेते शंकर चव्हाण, तालुकाध्यक्ष रूमलाल बिसेन,तालुकाध्यक्ष कैलास हांडगे, तालुकाध्यक्ष सुरेश वाघाडे, राहुल कोणतमवार, योगानंद पटले, राजेश रामटेके, मनोज नेवारे, टीकाराम मातवारे, सुरेश मेश्राम व इतरही सभासद पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Popular Articles