spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रियदर्शनी चारिटेबल ट्रस्ट द्वारा कोहळीत चौथी धम्म परिषद संपन्न

नागपूर :-  प्रियदर्शी चॅरिटेबल ट्रस्ट कोहळी च्यावतीने चौथ्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भदंत आनंद समता परिसर बाजार चौक कोहळी कळमेश्वर येथील समता सैनिक दलाच्या उपस्थितीत धम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर धम्म परिषदेचे उद्घाटन पु. भदंत परंमपदा यांच्या शुभहस्ते झाले. धम्म परिषदेत धम्म ध्वजारोहन, बुद्धवंदना, परित्रण पाठ, धम्मदेशना, नाट्य, परिसंवाद, भोजनदान, सत्कार, प्रबोधन आणि बुद्ध भीमगीते तसेच आंबेडकरवादी दृष्टिकोनातून बुद्ध धम्म त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष व दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेला 69 वर्ष पुर्णपणे होत असून धर्मांतराची 69 वर्ष आणि समाज वास्तव्य या विषयावर चर्चासत्रा घेण्यात आले. काटोल चे भीमेश भारती यांनी बुद्ध भीमगीते सादर केले. धम्म परिषदेचे कार्यक्रम ६ फरवरीच्या दरम्यान संपन्न झाले. धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला तन-मन- धनाने सहकार्य केले व बौद्ध उपासक तथा उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आले. या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धम्म परिषदेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तन्मनाने सहकार्य करून मोठ्या संख्येने उपासक – उपासिका या कार्यक्रमाला हजर होत्या. धम्म परिषदेत उपस्थितीत वासुदेवराव उके, संगमित्रा ढोके, अमर चवरे, प्रा.प्रवीण कांबळे, आणि ॲड स्मिता ताकसंडे यांची उपस्थिती होती. असे धम्मपरिषदेचे आयोजक रेश्मा शैलेश उके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

Popular Articles