spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतातील रब्बी पिक पिकविण्यासाठी बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी

यासीन शेख, गोंदिया तिरोडा :- शेतकरी शेतात उपलब्ध असलेल्या विद्युत पंपाच्या सहाय्याने रब्बी धान लागवड करीत आहे.पण मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा हा दिवसाला फक्त आठ तास करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. दिवसातून आठ तास विधुत पुरवठा सुरळीत राहत नसुन फक्त सहा तासच विद्युत पुरवठा राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील धान पिकाकरिता पाण्याची फार मोठी टंचाई निर्माण झाली आहे.अगोदरच शेतकरी हवालादिल झालेला असुन वेळेवर शासन धानाचे चुकारे सुध्दा देत नाही. त्यातच आठ तास विद्युत पुरवठा मुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे शासनाने शेतीकरिता दररोज १२ तास विधुत पुरवठा करण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी केली आहे.तिरोडा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.

तिरोडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उन्हाळी धनाचे पीक इलेक्ट्रिक मोटारच्या द्वारे घेतात. त्यामध्ये कवलेवाडा घाटकुरोडा मुंडीपार बेलाटी मुंडीकोटा , सरांडी, धादरी/उमरी गांगला वडेगाव नवेझरी मेंढा बेरडीपाल खुर्चीपार सोनेगाव डाकराम सुकळी चिरेखने मलपुरी व संपूर्ण तिरोडा तालुका बहुतेक शेतकरी विद्युत विभागाच्या लहरी धोरणामुळे बारा तासाऐवजी आठ तासाचा आदेश विद्युत विभागाच्या वतीने काढण्यात आले. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रत्येक सहा तासापेक्षा कमी विद्युत पुरवठा केल्या जातो. त्याच्यामुळे उन्हाळी धानाची लागवड करताना उशीर होत आहे.आधीच कर्जबाजारी झाला शेतकरी पुन्हा सावकाराच्या दरबारी घेतलेले कर्ज फेडता येईल की नाही. याच्यामुळे भयभीत झाला आहे. आणि इलेक्ट्रिक विभागाच्या धोरणामुळे त्याला कोणतेही पर्याय नाही.अशा प्रकारची स्थिती आज विद्युत विभागाने निर्माण केलेली आहे याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे. बारा तासाचा रद्द केलेला जीआर पुन्हाहून 12 तास विद्युत पुरवठा करावं नियमित करावा व आठ तास काढलेला जीआर रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्याकडून केलेली आहे अन्यथा रस्त्यावरून आंदोलन छेडले जाईल असा इशारा तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

Popular Articles