रामटेक :- महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीआयटीयु) चा वतीने (दि.१२ फेब्रुवारीला रामटेक तहसील कार्यालय समोर देशव्यापी संपाच्या समर्थनात निदर्शने करण्यात आली व नायब तहसीलदार हेमराज बडवाईक यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात कामगार विरोधी चार लेबर कोड रद्द करा, जुनी मनरेगा योजना पुनर्जीवित करा, वन व महसूल जमिनीवरील रहिवाशांना जमिनीचे पट्टे द्या, आशा, अंगणवाडी, शालेय पोषण कर्मचारी व महिला परिचर यांना किमान रुपये २६ हजार वेतन लागू करावे. अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेतमजूर युनियन चे जिल्हासचिव राजू हटवार,अँड. आनंद गजभिये, नत्थु परतेती, कल्पना हटवार, माया सहारे, गौरा माकडे, भाऊराव भिलावे, युवराज अडकणे, कृपासागर भोवते, गौतम नाईक, सुरेखा अडकणे, नामदेव मरसकोल्हे, सुखदेव सहारे, भारत अडकणे, हरिश्चंद्र तुमडाम, जावेद शेख, नरेश राठोड, छाया सरभाऊ, वामन मांडरे, बंडू रामटेके, पंजाब वारके, रवींद्र मेश्राम,विकास ढोके, मनोज आहके सहित सहभागी झाले.








