spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न; राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

तिरोडा :- तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष  रविकांत बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सांस्कृतिक भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाली.

बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची व पक्षनिष्ठेची आठवण काढली.

यावेळी तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, पक्षाचे विविध सेल व आघाड्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे व गावपातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्याचे आवाहन केले व यासह संघटनेच्या विविध पदांवर पदाधिकारी यांना नियुक्त पत्र देत नियुक्ती केली. व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

पक्षाच्या संघटनात्मक पदावर नियुक्ती आलेले पदाधिकारी –

१) नासिर घाणीवाला – जिल्हा महासचिव

२) विजय बुद्धे – तिरोडा शहर अध्यक्ष

३) संजय धुर्वे – अध्यक्ष, तिरोडा तालुका अनुसूचित जमाती सेल

४)  प्रकाश पटले – युवक अध्यक्ष, तिरोडा तालुका

५)  महेश कुकडे – अध्यक्ष, तिरोडा तालुका ओबीसी सेल

६)  निरज गजभिये – युवक महासचिव तिरोडा तालुका

७)  किशोर कुंभरे – तालुका महासचिव, अनुसूचित जमाती सेल

८)  मंदा टेंभरे – महिला अध्यक्ष, तिरोडा तालुका

९)  दिपलता ठकरेले – महिला अध्यक्ष, गोंदिया तालुका

१०) वैशाली तुरकर – महिला जिल्हा महासचिव

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मेघा बिसेन, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष युवराज शहारे, डॉ. सेल अध्यक्ष एम डी पटले,  खेमराज पटले, भाग्यश्री केळवतकर, सरपंच रविंद्र भगत, सरपंच विश्वनाथ बिसेन, संजय रहांगडाले, नरेश जांगडे,  बालकदास कुंभरे, मोहपत मानकर, जितेंद्र फरकुंडे,  सदाशिव कटरे, मंगेश गेडाम, केतन रामटेके, चरणदास भाजीपाले, राहुल हेडाऊ, विजय लिल्हारे, गोधन बसिने, ओमेश अंबुले, राजेश बोपचे, चेतनदास गोखे, दानवीर नंदेश्वर, मुरलीधर कटरे, विजय रहांगडाले, संदीप बिसेन, मोनिस सतीसेवक,  डिलेश बिसेन, संकेत शामकुल, यंद्रराज वासनिक, गुलाब कटरे, अंजु कटरे, वनिता डोंगरे, कमलेश ठाकरे, संतोष हिंगे, विवेक नागदेवे, राजकुमार ठाकरे, शुभम नखाते, राजेंद्र शेंडे,  गुणराज भैरम, विजेंद्र रहांगडाले, प्रदीप नंदेश्वर, छनालाल नागदेवे, अनिल रहांगडाले, नरेंद्र चौरे, मच्छिंद्र टेंभेकर आदीसह प्रमुख पदाधिकारी, विविध सेल व आघाडीचे अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles