spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आयजी संदीप पाटील यांच्याकडून भंडारा पोलीस दलाची पाठ थोपटली !

– ५८३ उमेदवारांची उपस्थिती, तर १५९ उमेदवार अपात्र; गुणवत्तेवरच होणार पोलीस शिपाई पदांची निवड

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेचा आज तिसरा दिवस उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील साहेब यांनी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानाला भेट देऊन सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस दलाने राबवलेल्या अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक नियोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत संपूर्ण टीमचे कौतुक केले.

पाहणी दरम्यान, महानिरीक्षक संदीप पाटील यांनी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांशी थेट संवाद साधला. भरती प्रक्रियेत पारदर्शकता टिकवण्यासाठी वापरण्यात येत असलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक पद्धतीची त्यांनी बारकाईने माहिती घेतली. अत्यंत पारदर्शक कामकाजाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि भंडारा पोलीस दलाच्या नियोजनाची विशेष प्रशंसा केली.

भरती प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी एकूण १,००१ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी ५८३ उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. आलेल्या उमेदवारांची सुरुवातीला प्राथमिक कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप करण्यात आले. यामध्ये विविध कारणांमुळे १५९ उमेदवार अपात्र ठरले. उर्वरित सर्व निकष पूर्ण करणाऱ्या ३८८ उमेदवारांनी मैदानी चाचणी देऊन आपली शारीरिक क्षमता सिद्ध केली.

भंडारा पोलीस प्रशासनामार्फत राबवली जाणारी ही निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर आधारित आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता उमेदवारांनी आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Popular Articles