– जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विभागाचे आवाहन
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन निर्णय दिनांक ३० ऑक्टोबर, २०२५ नुसार राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्याचे उद्देशाने राज्य स्तरावर उच्चधिकार समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीने शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून त्यांची थकित कर्जाच्या विळख्यातुन (DEBT TRAP) सोडवणुक करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करावयाचा आहे.
त्याअनुषंगाने, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भंडारा च्या माध्यमातून केलेल्या शेती कर्जाची मुदतीत परतफेड करु शकले नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार आल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही.
त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयातील सुचनेनुसार वरील थकित शेतकऱ्यांची कागदपत्र संकलित करण्याचे कामकाज भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखेकडून शाखा स्तरावर सुरु आहे.
त्यानुसार भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्नीत ३६८ सेवा / विविध कार्यकारी संस्थे मार्फत तसेच थेट बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी सभासदांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, शेतकऱ्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती जसे अद्यावत आधार कार्ड ची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक, अॅग्री स्टॅक फार्मर आय.डी. कर्ज खाते पास बुक आणि सेव्हींग खाते पास बुक ची झेरॉक्स त्वरित बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावे त्याचप्रमाणे ज्यांची माहिती संस्थेकडून संकलीत करण्यात आली अशा संभाव्य खातेधारकांची यादी संस्थेचे कार्यालय, तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तसेच बँकेचे शाखास्तरावर प्रसिध्द करण्यात येत आहे, सदरची यादी तपासून वरील त्रुटी असल्यास ती पुर्ण करुन जिल्हा प्रशासनास तसेच बँकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.




