– लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारांना मिळणार न्याय
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय, भंडारा तसेच साकोली, लाखनी, तुमसर, माहोडी, पवनी लाखांदुर येथील तालुका न्यायालयात शनिवार, 14 मार्च, 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ परिकम्य लेख अधिनियमाची प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, एम. एम. ई. बी प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, ग्राहक तकार न्याय निवारण प्रकरणे, न्यायालयातील प्रकरणे, न्यायालयातील बँकेशी संबधित प्रलंबित प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन/मोबाईल कंपनी संबंधित राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्था, ग्रामपंचायत प्रकरणे दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यास येणार आहे, पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी शनिवार दिनांक 14 मार्च रोजी आयोजीत राष्ट्रीय लोक अदालत समोर मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवुन आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन राजेश गोविंद अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळते., तसेच दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकरांच्या आपसी सहमतीने होते. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये झालेला न्याय निवाडा/तडजोडीचे समाधान दोन्ही पक्षकरांना असते. पक्षकारांचा न्यायासाठी लागणारा वेळ व पैसा दोन्ही ची बचत होते.. त्यामुळे पक्षकारांनी शनिवार दिनांक १४ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदातीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत असे आवाहन मिलींदकुमार विनायक बुराडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले आहे.




