spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पालोरा येथे ‘अखिल भारतीय समता सैनिक दल’ शाखेचे थाटात उद्घाटन; अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचा निर्धार

हंसराज,प्रतिनिधी भंडारा पालोरा  :- पवनी तालुक्यातील पालोरा येथे सामाजिक बांधिलकी आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने ‘अखिल भारतीय समता सैनिक दला’च्या नवीन शाखेची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने दलात प्रवेश केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन  पंचभाई होते. उद्घाटन पालोरा येथील सरपंच शिशुपाल रामटेके यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराम जाधव, कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वामन धारगावे, राष्ट्रीय जी.ओ.सी. मेजर नंदकिशोर मनवर, जिल्हा कमिटी अध्यक्ष भास्कर मनवर, सचिव हिरामण मुल, कोषाध्यक्ष जयदेव आबुलकर, तालुका कमिटी अध्यक्ष हंसकला देवगडे, उपाध्यक्ष तिलोत्तमा मेश्राम, सचिव रत्नदीप मांडवकर, कोषाध्यक्ष सुकेशनी पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी पालोरा येथील नवीन समिती गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी रंजना मेश्राम, उपाध्यक्षपदी रेखा धारगावे, सचिवपदी प्रज्ञा रंगारी तर कोषाध्यक्ष म्हणून दीपक मेश्राम यांची निवड करण्यात आली.

शाखाप्रमुख म्हणून उज्वला गोंडाणे, सहसचिव वंदना रंगारी, कमांडो देवानंद रंगारी, संघटक मेघा मेश्राम, सहसंघटक पुण्यशिला धारगावे, सदस्य म्हणून निरुपाला ठवरे, गिरजा मेश्राम, भाग्यशाली गोंडाणे आणि जिल्हा कमांडर म्हणून ईश्वर मेश्राम यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा प्रमुख अल्का देवगडे, कमांडो शीतल मांडकर, माधुरी शंभरकर, सुजाता लिंगाईल, हेमलता वाघमारे, रिता मुंघाटे, विशाखा मेश्राम, शशिकला ढाकणे आणि शाखा प्रचारक हंसकला देवगडे यांनी परिश्रम घेतले. समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी हे दल सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Popular Articles