हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्यात (19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंत्ती साजरी करण्यात येत असून दिनांक 10 फेब्रुवारी,2026 पासून माध्यमिक शालांत परीक्षा/उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सुरु झालेली आहे.त्याअनुषंगाने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन मी,अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी,भंडारा याद्वारे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात 5 किंवा अधिक व्यक्ती रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करित आहे..
त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 15 फेब्रुवारी ते 1 मार्च,2026 पर्यत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी लागू केले आहे.
या अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.