spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धामणगाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून दोन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा थाटात 

किशोर साहू, मौदा :- बुधवार ( ता.18 फेब्रुवारी) व गुरुवार ( ता.19 फेब्रुवारी ) ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजक आयोजक डीसीसी क्रिकेट क्लब तर्फे दोन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा धामणगांव येथे थाटात पार पडला .

यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील चिमुकल्या मुलांनी, मुलींनी व महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. गावातील चिमुकल्या मुलांनी सुंदर असे नृत्य सादरीकरण केले.चिमुकल्या मुलींना व विजेत्यांना विशेष पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा गौरव  डिसीसी क्रिकेट संघ धामणगांव तर्फे करण्यात आले.या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प सदस्य नागपूर देवेंद्र गोडबोले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी सरपंचा आजनगांव नीता पोटफोडे,नगरसेवक नगर पंचायत मौदा मोरेश्वर सोरते , माजी ग्रामपंचायत सदस्य मौदा रामप्रसाद पराते,धनराज चाफले, प्रमुख पाहुणे सरपंच गट ग्रामपंचायत धामणगांव ( कुंभारी) अक्षय पंचबुधे ,उपसरपंच राकेश मोटघरे, पोलीस पाटील मंगेश मोटघरे,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रायभान पंचबुधे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोटघरे ग्राम पंचायत सदस्य अजीत कडू,निलेश मोटघरे, बबलु परिहार (पाटील) ,धनराज जुमळे एलआयसी अभिकर्ता मनोज मोटघरे सह गावातील, परिसरातील ,तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक डीसीसी क्रिकेट संघ यांनी परिश्रम घेतले व समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.