spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा टाऊन हॉल ची निर्मिती करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– नवीन टाऊन हॉलच्या कामाच्या पाहणी दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरींनी दिल्या सकारात्मक सूचना

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल येथे श्रीमंत राजे रघूजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) नवीन इमारतीचे बांधकामाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी(ता.२२) पाहणी केली. दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या धरतीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज व सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा मनपाच्या नवीन टाऊन हॉल इमारतीसह सभागृहाची निर्मिती करावी अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी दिली.

पाहणी दरम्यान आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक बंडू राऊत, नगरसेवक सचिन नाईक, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, राजीव गौतम, अश्विनी एलचटवर, प्रफुलवेद इन्फ्राचे प्रफुल्ल देशमुख, पीएमसी क्रिरशन प्रा. लि.चे जितेंद्र लांवडे, मोहन साकळकर, मनपाच्या सचिव विभागाचे राजेश जामनकर उपस्थित होते.

सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाऊन हॉलच्या बांधकामाशेजारी असलेल्या हेरिटेज इमारतच्या बळकटीकरणाची पाहणी करीत बांधकामामध्ये काही महत्वाच्या सूचना देखील नोंदविल्या.

टाऊन हॉल इमारतीतील सभागृहाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दर्जात तडजोड करू नये, दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या धरतीवर टाऊन हॉल सभागृहातील साहित्य व इतर वस्तूची उत्तम सोय करावी. जुन्या हेरिटेज इमारती प्रमाणे सौंदर्यीकरण करावे, वातानुकूलित व्यवस्थेसह माइक, आसन व्यवस्था, अधिक उत्तम करण्यात यावी आदी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.

विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल येथे श्रीमंत राजे रघूजीराव भोसले सभागृह (टाऊन हॉल) नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आहे. ६८०८.१३ चौरस मीटर भूखंडामध्ये उभारण्यात आलेले नवीन टाऊन हॉल दोन तळमजले अधिक चार मजले असे आहे. खालच्या तळमजल्यावर अतिविशेष व्यक्ती, मा. महापौर यांचे वाहनांकरिता प्रवेश आणि पार्कींग, दुसऱ्या तळमजल्यावर मनपा सभागृहाचे मा. सदस्य आणि अधिकारी यांचे प्रवेश, कार्यालय परिसर आणि पार्कींग, पहिल्या मजल्यावर १५५ क्षमतेचे सभागृह आणि दुसऱ्या मजल्यावर २८८ सदस्य आणि ५० अधिकारी यांची आसन व्यवस्था असलेले मुख्य सभागृह, महापौर, आयुक्त, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांचे कार्यालय. तिसऱ्या मजल्यावर अभ्यागत, पत्रकार यांच्यासह २१० व्यक्ती आसन क्षमतेची गॅलरी आणि चौथ्या मजल्यावर कार्यालये, कॅन्टीन आणि मोकळे छप्पर आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.