मुंबई :- संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोक भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख, राज्यपालांचे परिसहायक ले. विक्रम कुमार तसेच लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी व लोकभवन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले.




