spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यिकच निवडा – मधुकर कुकडे

नागपूर :- विदर्भ साहित्य संघ ही मराठी भाषा – संस्कृतीची संस्था असल्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षपदी मराठी भाषी साहित्यिकच असला पाहिजे. अशी अपेक्षा अखंड महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मधुकरराव कुकडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यासाठी गिरीश गांधी यांचा पराभव करून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आणि त्यांच्या पॅनलला मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गिरीश गांधी हे भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करून कुकडे म्हणाले की, पुण्याच्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नागपुरातील जागेचा व्यापारी गैरवापर केल्याबद्दल न्यायालयाने त्यांच्याकडून 156 कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने ही रक्कम ७ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला. त्याविरुद्ध माजी विशेष याचीका सुप्रीम कोर्टात अजूनही प्रलंबित आहे. अशा माणसाला अध्यक्षपदी निवडून देऊ नका, अशी विनंती मी मतदारांना करतो.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.