– कुटुंबीयांना २ कोटी व कायमस्वरुपी नोकरी द्या- माजी मंत्री मुळक
सचिन चौरसिया,प्रतिनीधी रामटेक :- तालुक्याच्या या विशेषता देवलापार या आदिवासीबहुल भागात वन्यप्राण्यांचे हल्ले थांबण्याचे चिन्हे सध्या तरी दिसून येत नाही आहे. वाघांच्या हल्ल्यात मृत्यु झाला तर मृतकाच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये त्या जीवाची किंमत लावून वनविभाग जिम्मेदारी पासून मोकळे होतात, अशी टीका करत त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना किमान दोन कोटी रुपये व कुटुंबातील एकास वनविभागात कायमस्वरुपी नोकरी द्यावी. अशी मागणी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी केली आहे. सावरा येथील रहिवासी जुगळ्या यांचे पत्नी मुक्तावर वाघाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांचे कुटुंबियांचे सात्वन करण्याकरीता राजेंद्र मुळक यांनी भेट दिली. घरातील कर्ता व्यक्ती असला तर त्या तुटपुंज्या २५ लाखाने काय होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थीत केला असून त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना किमान दोन कोटी रुपये व कुटुंबातील एकास वनविभागात कायम नोकरी देणे आवश्यक आहे. यावेळी गावकऱ्यांनी मुळक यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य कैलास राउत, शांता कुमरे, डोंगरतालचे सरपंच उपेश उईके, रमेश कारामोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य पंचम चौधरी, पत्रकार कैलास निघोट, देवलापारच्या माजी सरपंच शाहिस्ता पठाण, सालईचे राजेश भोंडेकर, मोईन पठान आदी उपस्थीत होते. यानंतर मुळक यांनी रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्व. सुरज भुरा धुर्वे यांचे कुटुंबियांची भेट घेतली व सात्वन केले. खासदार शामकुमार बर्वे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जैयस्वाल तसेच वनमंत्री गणेश नाईक यांचेशी भेट घेऊन वाघाच्या वाघाचे वाढते हल्ले पाहता त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचे मुळक यांनी सांगीतले.




