नागपूर :- सौभाग्य नगर येथे नगरसेवक अजय बोढारे तसेच उपमहापौर लिला हातिबेड यांचा भव्य सत्कार व अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम सौभाग्य नगर विकास कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप तिडके तसेच हनुमान मंदिर व तुळजा भवानी पंच कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण चौधरी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांप्रती आपला सन्मान व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन डॉ.उम्मेद राऊत, उपाध्यक्ष, भाजप मेडिकल सेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या संपन्न झाला.यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मनोज लक्षाणे व विनय मेश्राम यांचे विशेष योगदान लाभले. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनाखाली परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.








