– मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज – मुख्याध्यापक सुनिल नेहारे
खापा, वार्ताहर :- पी. एम. श्री. न. प. राजेन्द्र हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन (दि.२७) रोजी शुक्रवाराला मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठकार, कवीवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून जगभरातील मराठी भाषकाकडून दरवर्षी साजरा केला जातो.
मराठी भाषेचा गौरव करणे तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आणि नवीन पिढीला भाषेचे महत्त्व पटवून देणे. हे या कार्यक्रमाचे उद्देश होते. भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्तकला व चित्तकला स्पर्धा, गीतगायन, नृत्य, कविता वाचन, लेझीम नृत्य अशा उपक्रमांना विदयार्थ्यांचा विशेष प्रतिसाद मिळाला. या आयोजनाकरिता शाळेतील शिक्षक सुनिल भांगरे यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे, पर्यवेक्षक शामराव खडसे, जेष्ठ शिक्षिका निता चामाटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
शाळेच्या अश्या उपक्रमांच्या पुढाकारामुळे शाळेतील विदयार्थी घडविण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात आले आणि भविष्यातही करणार. अशी ग्वाही मुख्याध्यापक सुनिल नेहारे यांनी दिली. विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज आहे, असे पटवून दिले.
यावेळी खडसे यांनी “मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून ती आपली संस्कृती आहे.” असे सांगून विदयार्थ्यांना अधिकाधिक मराठी पुस्तके वाचण्याचे आव्हान केले.
शाळेतील विद्यार्थी मोनिका चौरागडे, मुस्कान पठाण, निनावे, लक्ष्मी आष्ठनकर यानी भाषणे सादर केली. सुश्वाव्य सुरात मराठी गीत सादर करण्यात आले. स्वर्गात आकाशगंगा नृत्याचे उत्तम सादरीकरण करण्यात आले. विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ज्ञानाबरोबर साहित्यीक माहिती आणि सृजनशिलता यांचे उत्तम दर्शन विद्यार्थ्यांनी अनुभवले.
यावेळी शिक्षक भांगरे, खान, बावनकुळे, शिक्षिका मडके, पारधी, सांडे, नंदेश्वर, येवले, खोब्रागडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ७ व्या ड च्या विद्यार्थिनी कल्याणी ठमके व पूर्वी गढे यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक खडसे यांनी मानले.








