खापा, वार्ताहर :- जिजामाता विद्यालय व कनिष्ठ कला महाविघालय येथे शालेय परिसरात स्वच्छता अभियान अंतर्गत परिसरात असलेला काडी कचरा गोळा करून पर्यावरण पुरक होळीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका मुक्ता कडु यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याधापक सुधाकर गजभिये, शिक्षिका रचना मोहने यांनी होळी व धुलीवंदन या विषयावर माहीती दिली. त्याप्रसगी राजेन्द्र भोंगाडे, भारती कुमरे, देवेन्द धुंदे, पंकज बावनकर, उमेश चौरे, आनंद मेनकुदळे, वर्षा धार्मिक, विघा गभने, भाग्यश्री मायकारकर, प्रफुल वडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी शिला येनुरकर, सुमित्रा भारसाखरे, दर्शना खुबाळकर आदी उपस्थित होते.




