नागपूर :- माणूस फक्त भाकरीसाठीच नाही तर धर्माच्या आधारावर जगत असतो हेच पटवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशा करिता २ फरवरी १९३० साली आंदोलन करून आम्ही पण माणसे आहोत आम्हाला पण भावना आहे हे सांगायला आंदोलन केले होते परंतु इथल्या व्यवस्थेने ते नाकारले म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समता बंधुता, न्यायाच्या पुरस्कर्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्ग सुकर करावा लागला असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे युवा नेते हंसराज उरकुडे यांनी केले ते आज काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते वेळेस अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या प्रसंगी आंरिमो नेते जयदेव चिंवडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तर आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु दादा पांजरे यांनी केले कार्यक्रमात सुरज ढोणे चरणदास गायकवाड प्रकाश कांबळे, धर्माजी बागडे शालिक बांगर, मनोहर इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.
काळाराम मंदिरांचे आंदोलन हे कोणत्याही धर्माचा विरोधात नव्हे तर समतेचे प्रतिक होते – हंसराज उरकुडे









