spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रंगपंचमी बेतली जीवावर

खापा, वार्ताहर :- रामडोंगरी येथील कन्हान नदी पात्रात बुडून नविन वस्ती खापा येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (ता.३) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भिकूजी कोल्हे (वय २४ वर्ष) असे मृतकाचे नाव असून नविन वस्ती खापा येथील रहिवासी आहे. रामडोंगरी हडदगाव शिवारातील नदीपत्रात विशाल याची डांगरवाडी आहे. तो रंगपंचमी खेळून झाल्यावर डांगरवाडीकडे गेला. कन्हान नदीवर गेल्यावर पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला. पाण्याचा अंदाज न समजल्याने विशाल गटांगळ्या खात खोल पाण्यात गेला आणि बुडाला. ही घटना दुपारी तीन वाजता दरम्यान उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी त्वरित खापा पोलिसांना माहिती दिली. विशाल घरात हा तरुण असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले.

खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय. नारायण बोरकर, विशाल महालकर, नितेश चिपडे यांनी प्राथमिक तपास व पंचनामा करून सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनासाठी मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास खापा पोलिस करीत आहेत.

Popular Articles