spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“समर्थ भारत अभियान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

नागपूर :- मनोनिग्रह फाउंडेशन द्वारा आयोजित समर्थ अभियान अंतर्गत नागपूर विभागीय मनाचे श्लोक पाठांचे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 28_ 2 2026 ला आमदार निवासातील व्हीआयपी सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दयाशंकर तिवारी अध्यक्ष भाजपा नागपूर महानगर हे होते. त्यांनी मुलांनी लहानपणी पाठांतर करण्याचे फायदे स्पष्ट केले तसेच पुढची सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी मेहनत घेतली पाहिजे यावर भर दिला. संघटित, चारित्र्यवान आणि शक्तिसंपन्न समाज हा धर्माचा आधार आहे हे त्यांनी अधोरेखित केले .प्रमुख वक्ते डॉक्टर नितीन विघ्ने ,प्रसिद्ध समुपदेशक यांनी लहान वयात शरीरातील मेंदू कसा कार्यक्षम असतो, आणि त्याचा परिणाम पुढील आयुष्यात कसा होतो हे अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर पद्धतीने सांगितले व अरविंद पाटील निवृत्त सह दुय्यम निबंधक यांनी शिक्षक पालकांनी लहान मुलांवर लहानपणी केलेल्या संस्काराचे महत्त्व विशद केले, तर शीला अगस्ती निवृत्त शिक्षिका यांनी मुलांनी पाठांतर का करावे आणि मनाचे श्लोक हे पाठांतरासाठी चांगले कसे आहेत हे सांगितले. कार्यक्रमाला दीडशे विद्यार्थी तसे अनेक शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक आणि पालक मोठ्या संख्येत उपस्थित उपस्थिती होते .विजयी स्पर्धकांना मेडल ,ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. सर्वात जास्त विद्यार्थी सहभाग नोंदविणारी बी. आर. ए. मुंडले स्कूल यांना विशेष पारितोषिक मिळाले. अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम होण्यासाठी नागपूर विभाग प्रमुख श्री प्रशांत धर्माधिकारी आणि डॉक्टर प्रज्ञा पुसदकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन पद्मश्री माहुरकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रशांत धर्माधिकारी यांनी केले. अतिशय सुसंबद्ध आणि वेळेत असा हा कार्यक्रम पार पडला.

Popular Articles