spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोदलकसा गाव व बोदलकसा पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासाला आता मिळणार नवी गती

यासीन शेख, गोंदिया तिरोडा :- बोदलकसा गावाच्या विकासाला आता नवी गती मिळणार आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी या क्षेत्राचे कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुकाध्यक्ष जगदीश (बालू) बावनथडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी गावचे सरपंच चैतलाल पटले यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

या चर्चेतून बोदलकसाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चर्चेतील मुख्य मुद्दे गावाची प्रगती आणि पर्यटन क्षेत्रातील विकासावर विशेष भर देण्यात आला.गावामध्ये पर्यटनाच्या संधी वाढवण्यासाठी आणि गावातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चैतलाल पाटले यांनी जगदीश बावनथडे यांच्याकडे विशेष मागणी केली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू) बावनथडे यांनी आश्वासन दिले.

Popular Articles