spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मायाताईंना राज्यसभेची उमेदवारी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान – ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :- भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाच्या माजी सदस्या, नागपूर शहराच्या माजी महापौर व विद्यमान ज्येष्ठ नगरसेविका माया इवनाते यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली. हा दलित, आदिवासी समाजासाठी सतत संघर्षरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.

स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरु असलेल्या पारिवारिक एकछत्री राजकारणाला तिलांजली देत एका सर्वसामान्य महिलेला राष्ट्रीय राजकारणाची संधी देणे, हे केवळ भारतीय जनता पक्षामध्येच शक्य आहे, असे ते म्हणाले. त्यांनी राज्यसभेच्या उमेद्वारीबद्द्ल माया इवनाते यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या संधीमुळे दलित, आदिवासी समुदायातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात गती येईल, असा विश्वासही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

Popular Articles