spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सश्रम कारावास

पांढरकवडा :- सांस्कृतिक कार्यक्रमाचा सराव करून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या महेश मारोती चवले (२८, रा. वेळाबाई) या आरोपीला केळापूर न्यायालयाने २० र्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायाधीश अभिजीत एम. देशमुख यांनी गुरुवारी हा निकाल दिला. १३जानेवारी २०१७ रोजी रात्री आरोपीने पीडितेचे अपहरण करून तिला शेतात नेले. तिथे तिचे हात पाय बांधून आणि तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर वारंवार बलात्कार केला व जीवे मारण्याची धमकी दिली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून ही कडक शिक्षा सुनावली.

Popular Articles