spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कापूस वेचणी यंत्राद्वारे होणार

– कापूस वेचणी यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजन संपन्न.

नागपूर :- २७ फेब्रुवारी रोजी कापूस वेचणी यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले. कापूस वेचणी करिता असलेला मजुरांचा तुटवडा व वेचणी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक कापूस वेचणीचे प्रात्यक्षिक कॉनफेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री (CITI CDRA) द्वारे CICR व शक्तिमान ऍग्रो यांचे संयुक्तरीत्या CICR नागपूर येथे नुकतेच करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. जयंत मेश्राम वरिष्ठ शास्त्रज्ञ सीआयसीआर यांनी केले. डॉ.अर्जुन तायडे प्रमुख शास्त्रज्ञ यांनी कापूस वेचणी करिता मजुराची टंचाई व वेचनी करिता लागणारा साधारण १२ ते १५ रुपये प्रती किलो खर्च, यावर यांत्रिक वेचनि उपाय आहे. गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक (CITI CDRA), यांनी अतिघन कापूस लागवड पद्धतीमुळे कापसाचे उत्पादन वाढले आहे. यांत्रिक वेचनी यंत्राचा अतिघन लागवडीसाठी उपयोग होईल. डॉ.विजय वाघमारे संचालक केंन्द्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, यांनी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा लाभघ्यावा, कापूस वेचणी यंत्राचा वापर करणे, हे शेतकऱ्याना, कापूस वेचणीसाठी पुढील काही काळात उपलब्ध होईल. कापूस संशोधन संस्था शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, वेळोवेळी मार्गदशन करित आहे. डॉ. सीडी मायी माजी अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ दिल्ली, यांनी सल्ला दिला की अधिक किमतीचे यंत्र लहान शेतकऱ्यांना खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या ग्रुपद्वारे, शेतकरी उत्पादक कंपनी करून त्याचा वापर करावा. डॉ.रामकृष्ण ज्येष्ठ वैज्ञानिक, डॉ.जयंत मेश्राम, डॉ.के.पांडीयन, डॉ.शैलेश गावंडे तसेच राशी सीडचे मयूर खेत्रे, शक्तिमान चे किशोर वाघ, डॉ.राव यांनी कापूस उत्पादन वाढीसाठी व तांत्रिक कापूस वेचणी बाबत मार्गदर्शन केले. कापूस संशोधन संस्था पांजरी नागपूर येथे, शक्तिमान कापूस वेचणी यंत्राद्वारे कापूस वेचणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. डॉ.एस के शुक्ला डायरेक्टर, सिरकोट मुंबई, यांनी स्वच्छ आणि नीरभेळ कापसाचे महत्त्व अधोरेखित केले, यंत्राद्वारे कापूस वेचल्यानंतर त्यामध्ये कचरा जास्त असतो त्यामुळे कचरा विरहित प्रक्रियेसाठी, अत्याधुनिक जिनिंग प्रेसिंग ची व्यवस्था आवश्यक आहे. डॉ.एस.व्ही.सरोदे माजी संचालक, डॉ.प.दे.कृ.वि.अकोला, यांनी वेचनीच्या खर्च शेतकऱ्यांना जास्त येतो मजूर मिळत नाही, वेचनीकरता मशीन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते असे प्रतिपादन केले. शक्तिमान चे कापूस वेचणी यंत्राद्वारे कापूस वेचणीचे सीआयसीआर चे फिल्ड मध्ये, कापूस वेचनीचे प्रात्यक्षिक करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयंत मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब फंड, यांनी मानले. या कार्याक्रमाच्यावेळी महादेव चंद्रभान गावंडे ता.पारशिवनी जि.नागपूर, उमेश अजाबराव वाघमारे ता. काटोल जि.नागपूर, ज्ञानेश्वर सोनटक्के मु. कवठा जि.नागपूर, दिलीप विश्वेश्वर ठाकरे ता. सेलू जि.वर्धा, खुशाल महादेव कानकाटे ता.हिंगणघाट जि.वर्धा या पाच प्रगतीशील शेतकऱ्यांना मानचिन्ह व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास CITI CDRA नागपूर चे प्रकल्प अधिकारी युगांतर मेश्राम व वर्धा चे प्रकल्प अधिकारी अमित कवाडे आणि इतर कर्मचारी वर्ग व शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपस्थित होते

Popular Articles