भंडारा :- मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला गतीमान करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचे बजेट सादर केले आहे. राज्याच्या या बजेटमुळे राज्य आणखी गतीमान होईल. शेतकरी बांधवांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेचे मोठी घोषणा सरकार ने केली आहे. यामुळे राज्यातील शेतक-यांना आधार मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहे.
विदर्भात हरित क्रांती आणणारा वैनगंगा – नळगंगा प्रकल्पासह राज्यातील अन्य नदी जोड प्रकल्पांना मंजूरी देण्यासोबतच आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नळगंगा – वैनगंगा प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 4 लाख हेक्टर भूमी सिंचनाखाली येणार आहे. तथापि, विदर्भ सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील सुमारे 60 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. लाडकी बहिण योजना प्रभावीपणे सुरू ठेवणे, महिला सक्षमीकरण, कृषि व जलसंपदा भरीव तरतूद, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड, पायाभूत सुविधांचा गतिमान विकास, शाळांना अनुदान, आरोग्य केंद्रे डिजीटल करण्याची तरतूदीसह अन्य योजना सुरू करण्यात आल्या आहे.
अमरावती येथे बनणार डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल
डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची निर्मिती होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बजेट मध्ये ही घोषणा केली आहे. तसेच शालेय विधाथ्र्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा व संशोधनवृत्ती वाढावी यासाठी मुख्यमंत्री विधार्थी विज्ञान वारी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.




