नागपूर :- गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेच्या महिला मंडळातर्फे होळी निमित्त रंगपंचमी उत्सव आनंदात गांधीसागर उद्यान येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती सारिका नांदुरकर, नगरसेवक मनोज साबळे, नगरसेवक सचिन नाईक व शालेय विकास समितीच्या सदस्या नगरसेविका कांचन चव्हाण, माजी नगरसेविका हषेंला साबळे, देवेंद्र ढगे, सुदेश फुलझले व ॲड. श्रेयश कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते. होळीनिमित्त सर्वांनी रंगपंचमीचा आनंद घेऊन शुभेच्छा दिल्या व उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतिने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव नंदू लेकुरवाळे यांनी मानले कार्यक्रमात माधुरी कुंभलकर सुजाता फुलजले, सुलभा चौधरी, अर्चना वर्षे, रेखा फुलजले, सुनिता पेरूमुल्ला, सुधा पेरूमुल्ला, वंदना काटेकर, शोभा नाईक ज्योती नाईक, लता मोतेवार, आकरे सह शेकडो महिला उपस्थित होत्या.








