Monday, March 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. स्त्री ही समाजाची आधारस्तंभ आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासात तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

पूर्वीच्या काळात महिलांना अनेक बंधने आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांना शिक्षणाची संधी नव्हती, समाजात त्यांना समान अधिकारही मिळत नव्हते. परंतु काळ बदलत गेला आणि महिलांनी आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि धैर्याने समाजात आपले स्थान निर्माण केले. आज महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग, कला आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

घरात आई, मुलगी, बहीण आणि पत्नी या अनेक भूमिका स्त्री पार पाडते. ती कुटुंबाला प्रेम, माया आणि आधार देते. त्याचबरोबर ती समाजाच्या प्रगतीसाठीही मोठे योगदान देते. आजच्या काळात महिला डॉक्टर, शिक्षक, अभियंता, अधिकारी, उद्योजक अशा अनेक क्षेत्रांत यश मिळवत आहेत. त्यामुळे स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे.

महिला दिन हा फक्त उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर महिलांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने महिलांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना शिक्षण, सुरक्षितता आणि प्रगतीसाठी समान संधी मिळणे आवश्यक आहे. महिलांना प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला तर त्या समाजाला अधिक मजबूत आणि प्रगत बनवू शकतात.

आजच्या आधुनिक युगात महिलांनी अनेक मोठ्या कामगिरी करून दाखवल्या आहेत. त्यांच्या धैर्य, कष्ट आणि आत्मविश्वासामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा आदर करणे आणि त्यांना समान संधी देणे ही आपली जबाबदारी आहे.

महिला दिन आपल्याला हे शिकवतो की स्त्रीचा सन्मान आणि सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. महिलांना योग्य संधी दिल्यास त्या देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात.

म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन “स्त्रीचा सन्मान, समाजाचा अभिमान” हा संदेश पुढे नेला पाहिजे.

जगण्याला अर्थ देणारी ती,स्वप्नांना पंख देणारी ती.

प्रत्येक संकटाशी लढणारी ती,खरी ताकद म्हणजे स्त्री.”

सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

– कल्याणी नंदेश्वर

काॅन्सेलर ऑड सायकोथेरेपीस्ट.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com