spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आजनी येथे जागतिक महिला दिवस साजरा

कामठी :- रविवार दिनांक ८ मार्च रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथे ग्राम पंचायत भवनमध्ये राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, सचिव आशिष देशभ्रतार, सदस्या हेमलता उकेबोंदरे, श्वेता चौधरी, वत्सला इरपाते, रेणू हरणे, अंकिता हेटे, बिंदू गणवीर, वैशाली रामटेके, रंजना झलके, प्रिया वाट, रंजना रामटेके, रोशनी हिवरकर, अन्नपूर्णा उकेबोंदरे, मीना भोने, भीमराव नागोसे आदींची विशेष उपस्थिती होती.

नारीशक्तीचा जयघोष करून सुरुवात झालेल्या कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त मेघा वाट, हर्षलता हेटे, प्रभा वाणी यांनी आपापले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. शिल्पा नारनवरे हिने आभार व्यक्त केले.

Popular Articles