spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीतील थकबाकीदाराविरुध्द कामठी नगर परिषद ची कर वसुली मोहीम तेजीत 

कामठी :- कामठी नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून कामठी नगर परिषद ला प्राप्त विविध कर वसुलीतीन कामठी नगर परिषदचा कारभार सुरू करीत प्राप्त शासकीय निधीतून शहराच्या विकास करण्यात येतो तर स्थानिक मालमत्ता धारकाकडून मिळत असलेले’ कर ‘कामठी नगर परिषद च्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे.यासाठी नागरिकांनी कामठी नगर परिषद च्या विविध कराचा भरणा करून नागरिकांनी कामठी नगर परिषदला सहकार्य करावे असे नेहमी आवाहन करण्यात येते तरीसुद्धा बहुधा नागरिकांकडून कामठी नगर परिषद प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शहरातील विविध नागरिकावर कराची थकबाकी कायम आहे. या वर्षीचे आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असून नवीन आर्थिक वर्षे लागणार आहे तरीसुद्धा येथील स्थानिक मालमत्ताधारकावर मोठ्या संख्येत कराची थकबाकी आहे.या कर वसुलीसाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून कामठी शहरातील मालमत्ता थकीत दाराविरुद्ध मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वात थकीत कर वसुली पथक तयार केले असून थकीत कर आकारणी वसुलीला जोमात सुरुवात करण्यात आली असून कराचा भरणा करण्यासाठी कामठी नगर परिषद कार्यालय हे सुट्टीचे दिवस असलेले शनिवारी व रविवारी नगर परिषद कार्यालयचे कर वसुली कार्यालय सुरू ठेवण्यात येत आहे तेव्हा थकबाकीदारांना कराचा भरणा सोयीचे व्हावे व थकबाकीदारावर सिलबंद कारवाहीचा बडगा न पडावा यासाठी थकीत मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच कर वसुली पथकातील कर अधीक्षक विजयकुमार आत्राम,कर सहाय्यक पल्लवी हुमने, ,प्रदीप भोकरे,,रुपेश जैस्वाल , दीपक जैस्वाल,गौरव शर्मा, अक्षीश मलिक, शुभम टाकभवरे,विशाल नालेंद्रवार यांनी केले आहे.

– कर भरा नाही तर जप्तीची कारवाही सुरू

– कामठी नगर परिषद कर वसूली पथकाकडून कर वसुली पथक अधिक तीव्र केली असून कर वसुली पथक मैदानात उतरले आहेत कराचा भरणा करा नाही तर जप्तीची कारवाही होनार आहे.हे इथं विशेष!

Popular Articles