कन्हान :- माँ जगदंबा सेवा समिती रामनगर कन्हान महिला मंडळ व्दारे वसतीगृहातील ६ मुलींना शालेय भेटवस्तु आणि पाण्याच्या बॉटल्स, नँपकिन व बिस्किट पॉकेट तसेच विविध खेळातील विजयी मुलीना प्रथम, व्दितीय बक्षीष देऊन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात ़आला.
रविवार (दि.८) मार्च २०२६ माँ जगदंबा सेवा समिती रामनगर कन्हान महिला मंडळ व्दारे जागतिक महिला दिनानिमित्त कन्हान येथील ग्राम विकास कन्या वसतीगृह येथील ६० मुलींना शालेय भेटवस्तु देऊन व विविध मनोरंजनात्मक खेळ खेळुन त्यांच्या सोबत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व मुलींचा व पर्यवेक्षिका मीना अंबादे यांचा भेटवस्तु देऊन सत्कार कारण्यात आला.

याप्रसंगी आयोजक रेखा धगट, राधिका झेंडे, लक्ष्मी लाडेकर, आशा छलिया, वर्षा रोकडे, निलि मा फरकाडे, रीमा प्रसाद, हर्षलाता नानोटे यांचेकडुन सर्व मुलींना पाण्याच्या बॉटल्स, सोबत एक नॅपकीन व बिस्कीट पुडा देण्यात आला. विविध खेळातील विज यी मुलिंना प्रथम, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौर विण्यात आले. अशाप्रकारे जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला.








