कांद्री येथील गोदामात भीषण आग, लाखोंचा माल जळुन खाक

0
43

कन्हान :- कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावरील नंदकिशोर पोटभरे यांच्या घराच्या तळ मजल्यावर असलेल्या गोदामात अचानक भीषण आग लागली. या घटनेत इलेक्ट्रिक स्कुटर, कूलरची मोटर्स, बॉडीज, पाईप्स आणि फ्रेम सह लाखोंचा मुद्देमाल जळुन खाक झाला.

प्राप्त माहितीनुसार विश्वचषक ट्वेंटी २० साम न्यात भारताच्या विजयानंतर परिसरात जोरदार फटा के फोडुन विजयाचा जल्लोष साजरा केला. नंदलाल किसन पोटभरे यांच्या घराच्या तळमजल्यावर असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात कूलर ठेवले होते. दुकान बंद केल्यानंतर मालकाचा मुलगा घरी परतला, त्याने त्याची इलेक्ट्रिक स्कुटर गोदामात पार्क केली आणि वरच्या मजल्यावर गेला. काही वेळातच गोदामाच्या खिडकीतुन धूर निघतांना दिसला. शटर उघडुन स्कुटर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आगीने भीषण वळण घेतले. परिणामी गोदामातील प्लंबिंग पाईप्स, फायबर कूलर बॉडीज, मोटर्स, फ्लेक्स फ्रेम आणि इलेक्ट्रिक स्कुटर क्रमांक एम एच ४० डीजी ६६८८ सह लाखांचा मुद्देमाल आगीत जळुन खाक झाला.

कन्हान – पिपरी नगरपरिषद आणि कामठी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या गाड्या आणि शेजार च्या घरांमधील बोअरवेलमधुन पाणी वापरून आग आटोक्यात आणण्यात आली. अंकित कूलर्सचे रवी कोपल्लीवार यांनी गोदामात भाड्याने घेतले होते. तेथे अलीकडेच मोठ्या प्रमाणात कूलर ठेवले होते. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, एपीआय रोशन बावनकर आणि जयलाल सहारे सह आदि पोलिस कर्मचारी घटनास्थ ळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप कळु शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि ही घटना ‘अंगार रजिस्टर’ मध्ये नोंदवण्यात आली आहे.