– 7 कोटींचा पाणीकर थकीत
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिकांकडून नगर परिषद ला मिळत असलेल्या कर स्वरूपातून नगर परिषद चा आर्थिक कारभार सुरू असतो तर ही करवसुली नगर परिषद प्रशासनाची मुख्य आर्थिक स्रोत मानले जाते तर आर्थिक वर्षाचा शेवटचा मार्च एंडिंग महिना तोंडावर आला असूनही कित्येकाकडे कर वसुली थकीत आहे. नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 14 हजार 450 नळजोडनी धारकाकडे 7 कोटी रुपयांचा जलकर थकीत आहे.ज्यामध्ये चालू वर्षांची 1कोटी 57 लक्ष रुपयाची जलकर वसुली थकीत आहे.इतर नळजोडणी धारकाकडे थकबाकी अजूनही कायम आहे तेव्हा थकीत जल कराचा भरणा करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा नळजोडनी कापण्यात येईल असा ईशारा मुख्याधिकारी विनोद जाधव, जलप्रदाय अभियंता वीरेंद्र ढोके, जलप्रदाय निरीक्षक रंजित माटे यांनी दिला आहे.
कामठी नगर परिषद च्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या महितीनुसार शहरात निवासी नळ जोडणी, व्यापारी नळ जोडणी असे एकूण 15 हजार च्या जवळपास नळजोडनी धारक आहेत. या थकीत जलकरवसुलिसाठी जलकर विभागाने कंबर कसली असून जलकर वसुली मोहीम राबविने सुरू आहे तेव्हा थकीत नळ कनेक्शन धारकावर नळ कनेक्शन कापण्याची वेळ येऊ नये यासाठी थकीत जलकराचा लवकरात लवकर भरणा करून नगर परिषद प्रशासनाच्यापाणी पुरवठा विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे रंजित माटे यांनी केले आहे.या जलकर वसुली मोहिमेत जलकर वसुली पथक प्रमुख वीरेंद्र ढोके, रंजित माटे,अनुप वंजारी,राजेश कोडापे,कार्तिक डाँगे,चंदू शिवरकर,राजन श्यामकुवर कर्तव्यदक्ष भूमिका साकारत आहेत.
– मुख्यअधिकरी विनोद जाधव
कामठी नगर पालिका कर वसुली अभावी मोठ्या आर्थिक संकटात आहे याची जाणीव घेत नागरिकानी विविध करापोटी थकीत रक्कम जमा करून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव नगर परिषद प्रशासनाला सक्तवसुली करावी लागणार आहे .तेव्हा नागरिकानी थकीत कराचा भरणा करून थकीत कराचा भरणा करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे.




