spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान मध्ये गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजार, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

– तहसिलदारांना निवेदन; चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कन्हान :- कांद्री, टेकाडी आणि कन्हान परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात गेल्या काही दिवसांपासुन घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. कन्हान येथील गॅस एजन्सीकडुन हा तुटवडा कृत्रिमरीत्या निर्माण केला जात असुन सिलेंड रचा काळाबाजार होत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपुर ग्रामीण (अजित पवार गट) ने केला आहे. याप्रकरणी पारशिवनीचे तहसिलदार सुरेश वाघचौरे यांना जिल्हा महासचिव अशोक पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कन्हान येथील गॅस एजन्सीच्या चुकीच्या नियोजनामुळे सामान्य ग्राहक तासनतास रांगेत उभे राहुन ही त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. दुसरी कडे, गॅस एजन्सीकडे साठा उपलब्ध असुनही तो ग्राहकांना दिला जात नाही. हेच सिलेंडर रात्रीच्या वेळी दुप्पट किमतीत काळ्या बाजारात विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गॅस हा जीवनावश्यक घटक असतानाही एजन्सी चालकाकडुन ग्राहकांना सहकार्य करण्याऐवजी मानसिक त्रास दिला जात अस ल्याचा आरोप निवेदनातुन करण्यात आला आहे.

संबंधित गॅस एजन्सीचा स्टॉक आणि वितरण नोंदवही ची प्रशासनामार्फत तात्काळ धडक चौकशी व्हावी. रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक ग्राहकाला पारदर्शक पद्धतीने गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत. जर काळाबाजार सिद्ध झाला, तर संबंधित एजन्सीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. ” गॅस एज न्सीच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने एक समिती गठीत करून या प्रकरणाची ‘मौका चौकशी’ करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण महासचिव अशोक पाटील, जिल्हा सचिव राजेन्द्र हटवार, माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष सम्राट पगारे, राहुल सोनबरसे सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे. या निवेदना मुळे गॅस एजन्सीच्या वर्तुळात खळबळ उडाली असुन आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपुर्ण कन्हानवासीयांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles