किशोर साहू, मौदा :- आठ दिवसांपूर्वी पासून अमेरिका व इराण मध्ये युद्ध सुरू असून त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण जगातील देशा – देशांमध्ये होत आहे. भारतामध्येही याच्या विपरीत परिणाम तीन-चार दिवसापासून दिसायला सुरुवात झालेली आहे. तीन-चार दिवसापासून सिलेंडर मुबलक प्रमाणात मिळत नसून तुटवडा जाणवायला लागला आहे, त्यामुळे हॉटेलमध्ये आता चुली पेटवाव्या लागत आहे, असे तारसा फाट्यावरील एका हॉटेल चालकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुन्हा नागरिकांनी चुली पेटवायला सुरुवात केल्याने, धूर निघायला सुरुवात झालेली आहे. असाच प्रकार तालुक्यातील इतर गावांमध्ये, जिल्ह्यात, राज्यात व देशातही सुरू असल्याच्या बातम्या सर्वच माध्यमातून प्रकाशित होत आहे. त्यामुळे युद्ध अमेरिका व इराणचे सुरू मात्र भारतात निघत आहे धूर असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अमेरिका व इराण मध्ये युद्ध सुरू मात्र मौदा तालुक्यात निघत आहे गावा-गावातून धूर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



