तिरोडा :- आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुप यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन 15 मार्च ला सकाळी 11वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करून त्यांचे कार्य गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मीनाक्षी दहिवले, विधी सुनील ठाकरे, ज्वाला बागडे तसेच सैनिक स्कूल साठी पात्र ठरलेला अक्षत मितेश रामटेके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रंजू विजय दुधपचारे, चित्रशिला सचिन मेश्राम, बबीता भालाधरे, सीमा कोटांगले आणि अनिता सिंगंजुडे यांना ही सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. कुमुद मेश्राम, डॉ. प्रगती पुट्टेवार, भूमिका बेलानि, पोर्णिमा भाले, डॉ.श्रुति दुबे आणि ममता दुबे या प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि समाजातील महिलांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलका कोटागले सुत्रसंचालन राजश्री दहिवले यांनी तर आभार डार्विन संजय मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वी होण्यासाठी प्रिती अनील रामटेके, अंजू विनोद चव्हाण, डार्विन संजय मेश्राम यानी प्रयत्न केले .








