spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध घटकांसाठी अनुदान; शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ :- कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यात विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये क्षेत्र विस्तार घटकांतर्गत १ हेक्टर ते ४ हेक्टर पर्यंत मोठी रोपवाटिका, मसाला पिकामध्ये हळद, अद्रक लागवड व मिरची लागवड करणे, पुष्पोत्पादन घटकांतर्गत झेंडु लागवड, गॅलरर्डीया, निशीगंधा, लिली इ. लागवड करणे, आळिंबी उत्पादन करणे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन घटकांतर्गत आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू, आवळा, लिंबु, पेरु इ. लागवड करणे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवड करणे, मधुमक्षीका पालन करणे. जलस्त्रोताचे साधने सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळ्यासाठी अस्तरीकरण करणे, नियंत्रित शेती घटकांतर्गत प्लास्टिक मल्चिंग, शेडनेट हाऊस उभारणी, पॉलीहाऊस उभारणी, फळपिकांसाठी पक्षीरोधक गारपीठ रोधक जाळी आणि यांत्रिकीकरण घटकांतर्गत स्नॅपसॅक स्प्रेअर, पॉवर टिलर, २० अश्व शक्तीपर्यंत ट्रॅक्टर, मानव चलित अवजारे इ. घटकांकरीता अनुदान देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून वाढीव अनुदान मर्यादेनुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Popular Articles