spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महावितरण कामांतील गैरप्रकारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- नाशिक येथे महावितरणच्या कामांमध्ये तसेच खासगी कंत्राटदारांच्या संदर्भात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महावितरणची अधिकृत कामे आणि खासगी कंत्राटदारांकडून केली जाणारी कामे यामध्ये स्पष्ट फरक आहे. संबंधित कंत्राटदार महावितरणच्या यादीत नाही तसेच त्याला महावितरणकडून कोणतेही अधिकृत काम देण्यात आलेले नाही. मात्र, खासगी कामांच्या संदर्भात पदाचा गैरवापर करून कामे मिळवून देणे किंवा परवानग्यांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विजेच्या चोरीसंदर्भात प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, पुढेही गरज भासल्यास गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Popular Articles