spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनगणना २०२७ साठी जिल्हा प्रशासन सज्ज; १९१६ प्रगणक गटांचे प्रशिक्षण सुरू

– दोन टप्प्यात होणार देशाची महागणना; माहिती संकलनासाठी प्रथमच मोबाईल ॲपचा वापर

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- देशाच्या जनगणना 2027 या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्पयात प्रशिक्षणाची तयारी सुरू केली आहे.सध्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जनगणना 2027 साठी नियोजन सभागृहात अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षणाला 16 मार्चपासून सुरुवात झाली.यासाठी जिल्हास्तरावर मास्टर ट्रेनर यांचे यशदा संस्था पुणे येथे प्रशिक्षण झाले असून प्रत्येक जिल्हयासाठी एक मास्टर ट्रेनर देण्यात आले आहे.या जनगणना कार्यक्रमात केंद्राच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी असून निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हा जनगणना अधिकारी आहेत.या कार्यक्रमात मुख्याधिकारी हे शहरी तर तहसीलदार हे नियंत्रक अधिकारी आहेत. प्रशिक्षणात 1916 प्रगणक गटांना जनगणनेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.तर 342 सुपरवायझर देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

 जनगणना योजनेचा तपशील

• भारतीय जनगणना हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय कार्यक्रम आहे. भारताची जनगणना दोन टप्प्यांत आयोजित केली जाईल:

🔹 घरांची यादी आणि गृहनिर्माण गणना – एप्रिल ते सप्टेंबर, 2026

🔹 लोकसंख्या गणना – फेब्रुवारी 2027 (लडाख केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या बर्फाच्छादित असणाऱ्या ‘नॉन-सिंक्रोनस’ क्षेत्रांसाठी, लोकसंख्या गणना सप्टेंबर 2026 मध्ये केली जाईल).

🔹 राष्ट्रीय महत्त्वाचा हा मोठा उपक्रम सुमारे 30 लाख क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत पूर्ण केला जाईल.

🔹 माहिती संकलनासाठी मोबाइल ऍपचा आणि देखरेखीसाठी केंद्रीय पोर्टलचा वापर केला जाणार असल्यामुळे यावेळी अधिक चांगला गुणवत्तापूर्ण डाटा मिळेल.

🔹 माहितीचे वितरण खूप चांगले आणि वापरकर्त्यांसाठी सोप्या पद्धतीने केले जाईल, जेणेकरून धोरण-निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या निकषांवरील सर्व माहिती संगणकाच्या बटणाच्या एका क्लिकवर उपलब्ध होईल

🔹 ‘जनगणना-सेवा म्हणून’ मंत्रालयांना स्वच्छ, मशीनव्दारे वाचनीय आणि कृती करण्यायोग्य स्वरूपामध्ये डेटा उपलब्ध होवू शकणार आहे.

Popular Articles