यासीन शेख, गोंदिया :- आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2025- 26 मध्ये दिलेले उद्दिष्ट संपल्यामुळे पन्नास टक्के ऑनलाईन नोंद केलेले बरेचशे शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत.हे उद्दिष्ठ वाढवुन देण्यासाठी नागपुर विभागीय आधारभुत धान खरेदी फेडरेशन,खरेदी विक्री सह.संस्था अर्जुनी मोर. व अन्य सब एजंठ संस्था व सेवा. सह.संस्थांचे पदाधिकारी यांनी ता.15 मार्च रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना स्वतः भेटुन निवेदन सादर केले.
वरील विषयाचे अनुषंगाने भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर या पाचही जिल्ह्यातील सब एजंट सहकारी संस्थांनी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई चे वतीने तसेच शासनाने वेळोवेळी मुदतपूर्व दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ऑनलाईन नोंदणी करून हंगाम 2025- 26 खरीप हंगामात धानाची खरेदी केली. परंतु धान खरेदी करिता प्रत्येक जिल्ह्यात दिलेले उद्दिष्ट संपल्यामुळे पाचही जिल्ह्यातील खरेदी दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे 50% शेतकरी धान विक्री पासून वंचित आहेत. उद्दिष्ट अभावी धान खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा शासनाप्रती गैरसमज निर्माण होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धान केंद्रावर विक्री केली त्यांचे धानाचे विक्रीचे पेमेंट अजून पर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे. शासनाची धान खरेदी मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे. ऑनलाइन नोंद केलेल्या पाचही जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांचे धान खरेदी होण्याचे उद्दिष्ट धान खरेदीचे उद्दिष्ट पाचही जिल्ह्याला भरपूर प्रमाणात वाढवून देऊन धान खरेदी ची मुदत वाढवावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सोपविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य चामेश्वर गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विजय कापगते, खरेदी विक्रीचे संचालक रत्नाकर बोरकर, खरेदी विक्रीचे संचालक टीकाराम नाकाडे, सेवा सहकारी संस्था नवेगाव बांध चे उपाध्यक्ष अशोक हांडेकर, मंडळ अध्यक्ष राधेश्याम भेंडारकर, महामंत्री जयंत लांजेवार, व्यवस्थापक सुरेश गंथडे, प्रामुख्याने उपस्थित होते.








