spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्थायी समिती सभापतींनी स्वीकारला पदभार

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्त झालेल्या मनस्वी गिऱ्हे यांनी १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सभापती पदाचा कार्यभार विधिवत स्वीकारला.

पदभार स्वीकारताना चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार,बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, महापौर संगीता खांडेकर,उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनुरी नरेश,स्थायी समितीचे सदस्य तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संबंधित विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

पदभार स्वीकारल्यानंतर सभापती गिऱ्हे यांनी स्थायी समितीच्या माध्यमातून मनपाच्या विविध विकासकामांना गती देण्यासोबतच कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे नमूद केले.

Popular Articles