spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

…..अखेर आजनगाव येथे विविध विकास कामासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी केले 2 करोड 33 लक्ष रुपये मंजूर, सरपंच चिंतामण सारवे यांच्या प्रयत्नांना यश 

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत अंजनगाव येथे जन सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते बांधकाम करण्यासाठी 15 लक्ष रुपये ,अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी 11.25 लक्ष रुपये, ग्रीन जिम बांधकाम करण्यासाठी 7 लक्ष रुपये, सांड नदीवर ब्रिज कम बंधारा बांधकाम करण्यासाठी 2 कोटी रुपये असे एकूण 2 कोटी 33 लक्ष रुपये अखेर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर केले असून याबाबत सरपंच चिंतामण सारवे यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. गावाच्या महत्वपूर्ण विकास कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल सरपंच चिंतामण सारवे, उपसरपंच प्रफुल मेहर, ग्रामपंचायत सदस्य गण विलास वैरागडे, प्रमोद कडव, सुभाष कोराम ,सविता बांते ,वैशाली डोंगरे, सुजाता वाघमारे, सविता ठाकरे ,कल्पना कुकडे सह समस्त ग्रामवासियांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.

Popular Articles