spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या तीन विशेष समिती सभापतींनी स्वीकारला पदभार

– विधी, गलिच्छ वस्ती निर्मूलन, महिला व बालकल्याण विशेष समितीच्या सभापतीचे पदग्रहण

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या तीन विशेष समितींच्या नवनिर्वाचित सभापतींनी बुधवारी (ता.२५) त्यांच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली. मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात महापौर  निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी श्रीमती नंदा जिचकार, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, सरकारी वकील नितीन तेलगोटे, मीनाक्षी तेलगोटे यांनी विधी विशेष समिती सभापती निधी मीनाक्षी नितीन तेलगोटे, विधी अधिकारी सुरज परोचे, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती रूतिका मसराम, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नंदुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, विधी विशेष समितीचे सदस्य उपसभापती अॅड. संजयकुमार कृष्णराव बालपांडे, धनश्री आशिष देशपांडे, शारदा सुरेश बारई, कल्पक सदाशिव भनारकर, निलेश मनोहर गायधने, अॅड. शैलेन्द्र श्रीराम डोरले, अॅड. स्नेहल बंडू उर्फ ज्ञानेश्वर ठाकरे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सदस्य उपसभापती संदीप रमेशराव गवई, नागेश महादेव मानकर, योगिता धनराज तेलंग, हेमंत शांताराम बरडे, रितेश बापूराव पांडे, विवेक रमेश निकोसे, सुजाता विठ्ठलराव कोंबाडे, नगरसेवक मनोज साबळे, सचिन नाईक, योगेश पाचपोर, बंडू राऊत उपस्थित होते.

Popular Articles