खापा, वार्ताहर :- पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूल खापा येथे दि. २३ मार्चला पीएमश्री अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मुख्य व्याख्यात्या म्हणून जीवन विद्यामिशनच्या माणिक समीर पळसकर यांनी विद्यार्थ्यांना समृद्ध व आनंदी जीवनासाठी सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न, स्वअनुशासन, योग्य संगत व शिक्षणाचे महत्व पटवून सांगीतले.
शहीद दिनानिमित्य शोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व शहिदांच्या बलिदानाचे स्मरण करत देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आली. याचबरोबर कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून उज्वल यामसनवार, माधुरी यामसनवार, भारती बहादुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची रुपरेषा ज्येष्ठ शिक्षिका निता चामाटे यांनी तयार केली. याप्रसंगी शिक्षक श्रीकृष्ण मौंदेकर, प्रमोद बावनकुळे, विजय नांदेकर, अनिल टेकाडे, सुनिल भांगरे, सुनिल गाडीगोणे, सोनाली माडेकर, प्रतिभा खोब्रागडे, रेखा डोंगरे, ज्योती गजभिये यांनी कार्यक्रमाच्चा यशस्वीतेसाठी हातभार लावला. सुत्रसंचालन नम्रता मडके यांनी केले. तर पर्यवेक्षक शामराव खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.








