spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामटेक तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात

– ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ याची सखोल माहिती

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व पुरवठा विभाग रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हित जोपासावे. ग्राहक देवो भव असे ग्राहक पंचायतीचे सूत्र असून, संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रामटेक तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता मोरेश्वर माकडे यांनी केले. यावर्षीची थीम ‘सेफ प्रॉडक्ट कॉन्फिडंट कंझुमर’ नुसार मोरेश्वर माकडे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे रमेश बिरणवार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोणकोणत्या तक्रारीचे निवारण करू शकतात, तक्रारी कशा प्रकारचे असतात याबाबत माहिती दिली. वजन मापे विभाग अधिकारी व कार्यक्रमाचे मार्गदर्शक अनिल कोहाड यांनी वजन मापा संबंधी माहिती दिली. अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर ग्रामीण तथा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कांचनमाला माकडे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे साधक सूर्यभान चकोले, बबीता कोठेकर, पारस माकडे, सुरेखा उराडे, पुष्पा वाघुलकर, रंजना मस्के, डॉक्टर रीना जांभुळकर, मीना इंदूरकर, नानाभाऊ उराडे, सुकन्या दुडे, अर्चना मेश्राम, रंजना घरडे, योगिता कांबडी, इत्यादी हजर होते. कार्यक्रमाचे संचालन आनंद रामेलवार यांनी केले. आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक संदेश हलमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कुणाल ऊइके तथा पुरवठा विभाग कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. ‘जागो ग्राहक जागो’ चा नारा यावेळी देण्यात आला, रास्त दुकानदार, बचत गट प्रतिनिधी, विद्युत वितरक प्रतिनिधी, पोलीस डिपार्टमेंट प्रतिनिधी ,गॅस एजन्सी पदाधिकारी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ याची सखोल माहिती

अध्यक्षीय मार्गदर्शनात कांचनमाला माकडे यांनी ग्राहकांच्या विविध क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीचे अनेक किस्से सांगितले. तसेच भारतीय मानक ब्युरो, आयएसआय हॉलमार्क यासंबंधी विस्तृत माहिती दिली. जागरूक राहून उचित व्यवहार करा, फसवणूक टाळा, नेहमी दक्ष रहा, असा संदेश दिला. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ याची सखोल माहिती दिली.

Popular Articles