spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कचऱ्यात उभारले ग्रीन जिम

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या स्वास्थ्य उपवन केंद्रालगत असलेल्या पोरवाल पार्क परिसर लगत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यायाम करण्यहेतु ग्रीन जिम उभारण्यात आले आहे.या ग्रीन जिम भोवती एकीकडे झुडप्यांचा विळखा असून दुसरीकडे एका व्सवसायिकाचे मोठे लोखंडी साहित्य अतिक्रमित स्थितीत ठेवले आहे. नागरिकाना व्यायाम करण्यासाठी जागाच उरलेली नसल्याचे चित्र असून या ग्रीन जिम चा उपयोग होण्याऐवजी ते निष्क्रिय अवस्थेत पडून आहे.

या प्रकारामुळे जनतेच्या पैस्याची नासाडी होत असल्याची टीका स्थानिका कडून केली जात आहे. नजीकच असलेल्या स्वास्थ्य उपवन केंद्रात मॉर्निंग वॉकिंग ,योगा सारखे व्यायाम सह काही नागरिक लगतच असलेल्या पोरवाल सभागृहाच्या कडेला उभारलेल्या ग्रीन जिम मध्ये व्यायाम करीत आरोग्य सुदृढ करायचे मात्र या परिसराकडे नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने या ग्रीन जिम लगत झुडप्यांचा विळखा वाढलेला असून अतिक्रमण काऱ्यांनी आपले साहित्य ठेवून अतिक्रमनाचे बस्तान मांडले आहे.ज्यामुळे नागरिकांनी या ग्रीन जिम कडे पाठ फिरवली असल्याने सदर ग्रीन जिम ही शो पीस ठरली आहे.या परिस्थितीकडे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी व ग्रीन जिम नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरीकाकडून जोर धरत आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात उगवलेल्या झुडपामुळे किडे,कीटक तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नाकारता येत नाही यामुळे नागरिकांनी व्यायाम करायचं असे असा सवाल येथे उपास्थित होतो.

Popular Articles