spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिक्षण विशेष समिती सभापतींनी केले संजय नगर प्राथमिक शाळा व बालवाडीचे निरीक्षण

नागपूर :- मनपाच्या शिक्षण विशेष समिती सभापती  संतोषदेवी लढ्ढा यांनी संजय नगर प्राथमिक शाळा व बालवाडी येथे भेट देऊन शाळेचे सखोल निरीक्षण केले. यावेळी त्यांनी शाळेतील सर्व सोयी सुविधांची तपासणी करीत मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या प्रसंगी शिक्षणाधिकारी माधुरी काटकर, मुख्यध्यापिका  गीता दांडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता.

सभापती लढ्ढा यांनी संपूर्ण शाळा परिसराची पाहणी करून स्वच्छता, शिस्त व मूलभूत सुविधांची स्थिती तपासली. निरीक्षण दरम्यान आढळलेल्या त्रुटींवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याचे कडक निर्देश दिले तसेच भविष्यात कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधांची विशेष तपासणी करण्यात आली आणि आवश्यक त्या सुधारणा त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधला. सभापती यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण, स्वच्छता व आवश्यक सुविधा यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

Popular Articles