Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सराईत गुन्हेगार कुलदीपसिंग बिसेन उर्फ ठाकुर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील सराईत आरोपी नामे वरून कुलदिपसिंग बिसेन उर्फ वरून ठाकुर, वय ३१ वर्ष, रा. विटभट्ट्टा, मनसर ता. रामटेक जि. नागपुर याचे वर खुनाचा प्रयत्न अवैध अग्निशस्त्र बाळगने या सारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी हा असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असमाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित होता. नागपुर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरूध्द जेव्हा जेव्हा तकारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवुन त्याचे विरूध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे. पोलीसांनी आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. तरीसुध्दा आरोपीने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली.

आरोपींचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने तसेच आरोपी समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीसांकडुन एमपीडीए कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. जिल्हाधिकारी, नागपुर यांनी सराईत गुन्हेगार वरून कुलदिपसिंग बिसेन उर्फ वरून ठाकुर, वय ३१ वर्ष, रा. विटभट्टा, मनसर ता. रामटेक जि. नागपुर याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला असता रामटेक पोलीसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन दिनांक ३१/०३/२०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले नमुद आरोपीला अटक करून कारागृह नागपुर येथे दाखल केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.