जलालखेडा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी पोलीस स्टेशन जलालखेडा हद्दीत थडीपवनी आंध्रफाटा, ता. नरखेड येथे नाकाबंदी केली असता आयशर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच-४०डी-५८४८ ट्रॉलीसह मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती (गौणखनिज) आढळुन आली. ट्रॅक्टरचा चालक नामे भूमेश्वर सुरेंद्र शेळके, वय २३ वर्ष, रा. सायवाडा, ता. नरखेड, जि. नागपूर हा मिळुन आला. पोलीसांनी आरोपी चालकास रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. वाहन चालकास मालकाचे नाव विचारले असता स्वतःच मालक असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद आयशर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच-४०/डी-५८४८ व ट्रॉली किंमती ८,००,०००/- रूपये २) ०१ ब्रास रेती (गौणखनिज) किंमती ५,०००/- रूपये असा एकुण ८०५०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी चालक व मालक भूमेश्वर सुरेंद्र शेळके, वय २३ वर्ष, रा. सायवाडा, ता. नरखेड, जि. नागपूर याच्या विरूध्द पोस्टे जलालखेडा येथे कलम ३०३ (२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

